करमाळा तालुक्यातील अनुराग वाघमोडेनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये मिळवला महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील निलज गावचे सुपुत्र चि. अनुराग महादेव वाघमोडे यांनी राज्यस्तरीय इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे तो सध्या रत्नागिरी येथे शिक्षण घेत आहे कैलासवासी ज्ञानदेव वाघमोडे यांचे नातू असून सोलापूर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघमोडे यांचा पुतणे आहे राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला अनुराग वाघमोडे यांना गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पोलीस महासंचालक कार्यालयीन अधिक्षक गहिनीनाथ वाघमोडे तसेच करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवराकडून त्याचे अभिनंदन होत आहे.