करमाळा शहरामध्ये सावंतगटाच्या वतीने जामा मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील जामा मस्जिद येथे सावंत गटाच्या वतीने इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत, नगरसेवक संजय सावंत नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार करमाळा विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष मनोज गोडसे भारिप चे देवा लोंढे माजी नगरसेवक दिपक सुपेकर,नासीर कबीर आशपाक सय्यद आलीम शेख विजय सुपेकर आदीजण उपस्थित होते
सर्व प्रथम जामा मस्जिद जमात च्या वतीने सिंकदर सय्यद मजहर नालबंद, जमीर सय्यद हाजी उस्मान सय्यद, वाजीद शेख फिरोज बेग अकबर बेग यांनी इफ्तार पार्टी साठी आलेल्या सर्वाचे टोपी व रूमाल देऊन स्वागत केले
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत बोलताना सुनील बापु सावंत म्हणाले की, जामा मस्जिद मध्ये सावंत परिवार गेल्यां तीन पिढ्यापासुन म्हणजे कै,डी,के, सावंत,कै, सुभाष आण्णा सावंत यांनी चालु केलेली परपंरा आम्ही तिसरी पिढीत ही माझे बंधु पं,स, सदस्य राहुल सावंत वकील नगरसेवक संजय सावंत व आमचे सर्व सावंत परिवार जपत आहें दरवर्षी मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टी चे आयोजन करुन यामधुन सामाजिक सलोखा टिकवुन ठेवण्यासाठी इफ्तार पार्टी हे एक चांगले माध्यम आहे रमजान महिना हा मुस्लिम समाजातील पवित्र म्हणुन गणला जातो या महिन्यात नरकाचे दरवाजे बंद होऊन स्वर्गाचे दरवाजे उघडलेले असतात असे ग्रंथात लिहले आहे म्हणूनच रमजान मध्ये आपल्या वाईट कर्माची माफी मागुन सत्कर्म करण्याचा निर्धार करावा व वाईट प्रवृतीचा नायनाट करावा रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव रोजा ठेऊन तराबीची नमाज अदा करुन अल्लाह ला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात रोजा (उपवास) ठेवणे हां सुध्दा एक प्रकारे आरोग्याच्या दृष्टिने उपयुक्त असुन शास्त्रीय दृष्टया हे सिध्द झाले आहे असे ते यावेळी म्हणाले
यावेळी समीर शेख़, नागेश उबाळे, पांडुरंग सावंत दिपक मुसळे जावेद शेख अल्ताफ दारुवाले मैनुद्दीन बेग आनंद रोडे राजु वीर,हुजेफ शेख ,मुद्दस्सर शेख युवराज सिरसट रमेश हवालदार,साजीद बेग सागर सामसे मुनाज शेख,अमोल मोरे आलीम खान,आदीजण उपस्थित होते.
