करमाळाकृषी

विहाळ येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. चालू हंगाम 2022-23 ची पहिली उचल 2300 रूपयांप्रमाणे देणार-प्रा.शिवाजीराव सावंत

विहाळ प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विहाळ येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. चालू हंगाम 2022-23 ची पहिली उचल 2300 रूपयांप्रमाणे देणार असल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री प्रा तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगरच्या सोनारी, विहाळ, लवंगी, वाशी व आलेगाव या पाचही युनिटच्या माध्यमातून शेतकर्यांच्या ऊसाला चांगला भाव देत ऊस उत्पादक शेतकर्यांना अर्थिक हातभार लावण्याचे काम सावंत परिवार करत आहे.
करमाळा तालुक्यातील विहाळ येथील भैरवनाथ शुगरने गेल्या हंगामात २२०० रूपयांचा दर दिला आहे. २०२२-२३ च्या चालू हंगामातील गाळप सुरू झाले असून शेतकर्यांना पहिली उचल 2300 रूपयांप्रमाणे दिली जाणार आहे. शेतकर्यांचा सर्व ऊस गाळपासाठी प्रोग्रामप्रमाणे नेला जाणार असून चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा कारखान्यास करावा असे आवाहनही प्रा.सावंत यांनी केले. शेतकर्यांनी आजपर्यंत दाखवलेल्या विश्वासावरच भैरवनाथ शुगरचे विक्रमी गाळप होईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. अनिल सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक मा. किरण तात्या सावंत यावेळी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group