वाशिंबे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवड नवनाथ बापु झोळ यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध
करमाळा प्रतिनिधी वाशिंबे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटी निवडणूक दिलिप तिजोरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अधिकारी करमाळा, जि.सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड पार पडली. यावेळी मा.आ. नारायण आबा पाटील गटाचे चेअरमनपदी कांतीलाल नारायण झोळ व व्हाईस चेअरमनपदी सौ.स्वाती नितीन जाधव यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी उपस्थित नेते नवनाथ बापू झोळ, राजाभाऊ झोळ, सरपंच बाळासाहेब झोळ, भास्कर झोळ गुरूजी, संपत झोळ, संदिप झोळ, अशोक वाघमोडे, अजित झोळ, सुभाष झोळ, लालासो जाधव, सचिन भोईटे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
