वाशिंबे गावच्या विकासासाठी विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध- तानाजी बापु झोळ
वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व गटात तटाच्या कार्यकर्त्यांनी मिळून वाशिंबे गावची विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध केली असून गावचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे संजय मामा शिंदे गटाचे नेते तानाजी बापू झोळ यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की वाशिंबे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नारायण पाटील गट संजय मामा शिंदे गट बागल गट या सर्वांशी विचारविनिमय करून वाशिंबे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली असून सर्व कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे. वाशिंबे गावच्या विकासासाठी नारायण पाटील गटाला अडीच वर्ष चेअरमनपदी समसमान संधी देण्यात आली असून अडीच वर्ष आम्हाला म्हणजे संजय मामा शिंदे गटाला संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राजकारणापेक्षा गावचा विकास हेच आमचे ते असलेने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन चर्चा करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गावकऱ्यांनी ठरवुन ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
