कुकडीचे रब्बी आवर्तन 1 जानेवारीपासून सुरू करमाळा तालुक्यात 7 जानेवारीपर्यंत दाखल होणार…आ.संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
कुकडी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पाचे आवर्तन 1 जानेवारी 2022 पासून सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सदर आवर्तन टेल टू हेड या पद्धतीने होणार असून आवर्तन सुरू झाल्यापासून 5 ते 6 दिवसांमध्ये पाणी तालुक्यांमध्ये प्रवेश करील. रब्बी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर उन्हाळी आवर्तनही लवकर मिळावे अशी मागणी आपण केली असल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली.
कुकडी सिंचन मंडळाच्या अंतर्गत होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला कर्जत चे आमदार रोहित दादा पवार, शिरूर चे आमदार एड. अशोक पवार ,जुन्नरचे आमदार अमित बेनके, आमदार संजय मामा शिंदे आदी उपस्थित होते.
