आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित पांडे येथे हिमोग्लोबिन तपासणी महिला मेळावा संप्पन
पांडे प्रतिनिधी पांडे येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी युवती सोलापूर जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले यांनीसुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती करमाळा आयोजित, हिमोग्लोबिन तपासणी शिबिराला भेट देऊन झाली. पक्ष, संघटना वाढ, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळा पर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विषयांवर या वेळी सलगर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिलांचे प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना करण्या संदर्भात ही चर्चा झाली. या आढावा बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस करमाळा यांच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीत करमाळा युवती तालुकाध्यक्षा शीतल क्षीरसागर यांनी युवती काँग्रेस मार्फत संपुर्ण तालुक्यात सुरु असलेल्या “क्रांती एक पाऊल छेडछाड मुक्तीकडे व सायबर अलर्ट” या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच संघटनावाढी साठी नवीन सदस्य नोंदनी सुरू करण्यात येणार आहे अशी उपस्थितांना माहिती दिली.या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हाकार्यकारणी सदस्य शीतल क्षीरसागर, स्नेहल अवचर, ऋतुजा सुर्वे, सारिका गायकवाड, तेजस्वीनी घाडगे, दिलखूष तांबोळी, नम्रता पाटील, हर्षाली परचड राव, श्वेता देशपांडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, महिला जिल्हाउपाध्यक्षा नंदिनी लुंगारे, गावातील ग्रामस्थ ज्ञानदेव क्षीरसागर, गहिनीनाथ वीर, प्रदीप क्षीरसागर, साहिल मुजावर, समीर सय्यद, अजय भोसले व गावातील बहूसंख्य युवती व महिला भगिनी उपस्थित होत्या.
