करमाळा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भाजपच्याच चिन्हावर लढवावी -सचिन पिसाळ

 

करमाळा-प्रतिनिधी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे बारा गण हे कमळाच्या चिन्हावर लढविण्यास ग्रामीण भागातील कार्यकर्ते उत्सुक असून तशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व भाजपा नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या कडे करणार असल्याची माहिती भाजपा करमाळा तालुका ग्रामीण अध्यक्ष सचिन पिसाळ यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सदरील निर्णय सर्वानुमते झाला असून कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवणार असून दिग्वीजय भैय्या बागल यांच्या मूळे ग्रामीण भागातील भाजपा समर्थक कार्यकर्ते व सर्वसामान्य भाजपा समर्थक यांच्या मध्ये चैतन्याचे वातावरण असून त्यांच्या नेतृत्वाला मानणारा मोठा वर्ग भारतीय जनता पार्टी कडे आकर्षित झालेला आहे.
त्यामुळे करमाळा तालुक्यात शतप्रतिशत भाजपा आणण्याचा निर्धार आम्ही केला असून जिल्हा परिषद व पंचायत समिती वर भाजपचाच झेंडा फडकवण्यास आम्ही कार्यकर्ते सज्ज असल्याचेही पिसाळ यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!