राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादा आल्याने संजयमामा यांची गाडी सुसाट प्रतिस्पर्धी झाले अवाक
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये राज्यामध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचा परिणाम झालेला स्पष्ठपणे दिसून येत असून सत्तेबाहेर असणारे महाविकास आघाडीचे आमदार संजयमामा शिंदे यांचे नेते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यासह भाजप शिवसेनेला पाठिंबा दिला असुन सत्तेत सहभागी झाले आहे यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे.पुरेसा व योग्य प्रमाणात निधी न मिळाल्याने करमाळा तालुक्याची विकास कामे रखडली होती आता आपला नेताच शिवसेना भाजपामध्ये युतीमध्ये सामील झाला असल्यामुळे राज्याचा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे रखडलेली कामे यासाठी निधी मिळणे सोपे झाले आहे. करमाळा तालुक्यामध्ये जी विकास कामे रखडली आहेत त्या कामांना तात्काळ निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करमाळा तालुक्याचे विचार करता शिवसेना शिंदे गटामधून माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी पाठपुरावा करून कामाचा रेटा पाठपुरावा करून चालू ठेवला आहे. करमाळा तालुक्याची विकास कामे करून त्याच्या माध्यमातून जनतेसमोर जायचे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पांठिबा देणारे उपमुख्यमंत्री समर्थक स़ंजयमामा शिंदे आल्यामुळे याचा परिणाम नक्की होणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी बागल गट ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक असल्याने त्यानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आदिनाथ व मकाई कारखान्याला काही प्रमाणात सहकार्य मिळाले परंतु सत्ता राजकारणाच्या सारीपाटावर शिंदे एकनिष्ठ राहिल्याने आदिनाथ व मकाई कारखान्याला पाहिजे तशी मदत मिळाली नाही आता कुठे संधी मिळण्याची आशा होती बागल गटाच्या रश्मी बागल यांनी विधानसभेला राष्ट्रवादी मधून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांना सर्व नेत्यांची मर्जी राखावी लागणार आहे. काही दिवसापुर्वी त्यांचा भाजपामध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग सुकर होता परंतु स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्ताने मोहिते समर्थक भाजप नेत्यांचा आग्रह असतानाही त्यांना या योगाचे व संधीचे रूपांतर राजकीय फायद्यात करून घेण्यात बागल गट कमी पडला असेच म्हणावे लागेल तर दुसरीकडे विरोधकाच्या कुठल्याही कामांमध्ये आडकाठी न आणता वैयक्तिक टीका टिपणी न करता आपले काम शांततेने व संयमाने करत संजयमामाने बेरजेचे राजकारण करण्याचे काम केले आहे. एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती बघता करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये गटातटाचे राजकारण चालू असते अशा परिस्थितीमध्ये गटातटाच्या राजकारणात पक्षीय राजकारणाला महत्त्व आले आहे.आजच्या परिस्थितीमध्ये संजयमामा शिंदे यांना कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे आव्हान कायम असल्याचे सध्या दिसून येत आहे. बागल गट ऐनवेळी ठोस भूमिका न घेता कच खाऊ धोरणामुळे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदर सध्याच्या राजकीय स्थित्यंतराचा विचार करता आमदार संजयमामा शिंदे गट सुसाट चालला असून बाकीचे गट मात्र ऐनवेळी राजकीय भूकंप झाल्याने अवाक झाले आहेत.
