अनिल सदाशिव चिवटे आणि सोहम महिला मंडळ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह समाप्तीनिमित्ताने नगरप्रदीक्षणा संप्पन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील राशीनपेठ येथील श्री गणेश मंदीरात दि. १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह उत्साहात पार पडला. वे.मू.श्रीराम शास्त्री जोशी (दौंड) यांनी आपल्या सुमधुर वाणीतून सुरस विवेचन करत शहरातील भाविकांनी मंत्रमुग्ध केले. अनिल सदाशिव चिवटे आणि सोहम महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दि. १८ रोजी कथा समाप्ती नंतर सूर्यकांत सदाशिव चिवटे, अनिल सदाशिव चिवटे, संजय सदाशिव चिवटे आणि बसवराज सोमनाथ चिवटे यांच्या हस्ते सपत्नीक विष्णू सहस्त्रनाम यज्ञ करण्यात आला.
त्यानंतर सोमवार दि. १९ रोजी भागवत ग्रंथाची शहरातून भव्य अशी नगर परीक्रमा उत्साहात काढण्यात आली. यावेळी परिक्रमा मार्गावर महिला भाविकांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि नागरीकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत वे. मू. श्रीराम शास्त्री जोशी, आयोजक सौ. सविता अनिल चिवटे अनिल सदाशिव चिवटे यांचे पूजन करत दर्शन घेतले.या परिक्रमेत भाविक महीलांनी फेर धरून फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. परीक्रमा पार पडल्यानंतर कथा स्थळी आनंद महाराज यांचे किर्तन झाले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राशिनपेठ तरूण सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
