Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत पोथरे शाळेचा दबदबा कायम


करमाळा  प्रतिनिधी 
पंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा यांचे वतीनेआज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला करमाळा येथे घेण्यात आलेल्या टॅलेंट हंट तालुकास्तरीय स्पर्धेत (वैयक्तिक प्रकार ) जिल्हा परिषद पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . यामधे प्रामुख्याने यशस्वी स्पर्धक खालीलप्रमाणे –
*कथाकथन स्पर्धा
लहान गट –
व्दितीय क्रमांक – वैष्णवी गणेश शिंदे ( इ. पाचवी )
तृतीय क्रमांक – श्रावणी ज्ञानेश्वर शिंदे (इ . चौथी)
मोठा गट –
तृतीय क्रमांक – सई सचिन शिंदे ( इ. सहावी )

*चित्रकला स्पर्धा*
मोठा गट –
प्रथम क्रमांक – तेजस्विनी सुनिल झिंजाडे (इ . सातवी )
व्दितीय क्रमांक – संस्कृती राजेंद्र झिंजाडे (इ . सातवी)
लहान गट –
तृतीय क्रमांक – मृणाल बप्पासाहेब शिंदे ( इ . पाचवी )

*निबंध स्पर्धा*
मोठा गट –
तृतीय क्रमांक – सानिका अशोक नंदरगे (इ . सातवी)
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री . नितीन कदम साहेब, विस्ताराधिकारी श्री . जयवंत नलवडे साहेब, श्री . टकले साहेब , श्रीम. प्रभावती जगताप मॅडम ,पोथरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे सर व पोथरे शाळेचे मुख्याध्यापक श्री . शकुर शेख सर यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचा विशेष सन्मान करून त्यांचे कौतुक केले .
या सर्व स्पर्धकांना पोथरे शाळेतील विषयशिक्षिका श्रीम . शगुफ्ता हुंडेकरी (शेख) मॅम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याकामी शाळेतील उपशिक्षक श्री . बापूराव रोकडे सर, श्री. लहू जाधव सर, श्रीम. शाबिरा मुलाणी मॅम, श्रीम. राजश्री सावंत मॅम यांचे विशेष सहकार्य लाभले .
पोथरे शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षी तालुका स्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवून पोथरे गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . यशवंत शिंदे, उपाध्यक्षा सौ . विद्याताई शिंदे व सर्व सन्माननीय सदस्य तसेच पोथरे गावचे सरपंच मा .श्री . अंकुश शिंदे सर व सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी सर्व सहभागी स्पर्धक, मार्गदर्शक व सर्व शिक्षक यांचे आभार मानून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!