घारगाव येथील विशाल सरवदे याच्या टारगेट स्काय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बेंगलोरमध्ये पंचफुला या लघुपटाला दोन नामांकन
घारगाव प्रतिनिधी
घारगाव येथील सुपुत्र पुणे येथे जे एस पी एम या ठिकाणी इम्पेरियल अध्यापक विद्यालय हांडेवाडी येथे शिक्षण घेत असलेले विशाल संजय सरवदे यांनी काढलेल्या *पंचफुला* या लघुपटाला टारगेट स्काय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बेंगलोर येथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लघुपट म्हणून नामांकन मिळाले असून विजयी घोषित झाला आहे. आतापर्यंत पंचफुला या लघुपटाने अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन मिळविलेले आहेत ग्रामीण भागातील संकल्पना या लघुपटामध्ये मांडलेली आहे पंचफुला या लघुपटाचे सर्वत्र कौतुक होत असून डायरेक्टर विशाल सरवदे यांचे देखील घारगाव ग्रामपंचायत कडून व ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.
