करमाळा तालुक्यातील 108 ग्रामपंचायत मधील 220 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत माध्यमातून एकसमान युनिफॉर्म ओळखपत्र देण्यात येणार- मनोज राऊत
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सर्व 108 ग्रामपंचायत मधील 220 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत माध्यमातून एकसमान युनिफॉर्म आणि ओळखपत्र देण्यात आलेले आहे अशी माहिती गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर फिसरे येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.यापुढे कर्मचारी कर्मचारी अतिशय सुबक अशा ड्रेस कोड मध्ये दिसतील.असा प्रयोग राज्यात प्रथमच करण्यात आलेला आहे. या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते युनिफॉर्म वाटप करण्यात आले.असा युनिफॉर्म संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना मा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.
