पंचफुला या लघु चित्रपटाला आतापर्यंत 50 पेक्षा जास्त अवार्ड मिळाल्याबद्दल दिग्दर्शक विशाल सरवदे यांना करण्यात येणार सन्मानित
करमाळाा प्रतिनिधी घारगाव येथील सुपुत्र पुणे येथे इम्पेरियल अध्यापक विद्यालय हांडेवाडी हडपसर येथे शिक्षण घेत असलेले पंचफुला दिग्दर्शक विशाल संजय सरवदे आणि प्रोडूसर संजय सरवदे यांनी काढलेल्या *पंचफुला* या लघु चित्रपटाला आत्तापर्यंत इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये 50 पेक्षा जास्त अवॉर्ड मिळून सन्मानित केले आहे त्याबद्दल २९ जानेवारी रोजी जयंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मा प्राध्यापक श्री तानाजीराव सावंत साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पंचफुला या लघुपटाचे दिग्दर्शक विशाल संजय सरवदे यांना जयंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे सन्मानित करण्यात येणार आहे असे इम्पेरियल अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य शेंडगे सर यांनी कळविले आहे.