यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्यावतीने फिसरे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा सांगता समारंभ वृक्षारोपण बेटी बचाव रॅलीने संपन्न
करमाळा प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा राष्ट्रीय सेवा योजना +2स्तर व ग्रामपंचायत फिसरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीराचा सांगता समारंभ संपन्न प्रसंगी फिसरे गावामध्ये वृक्षारोपण व बेटी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते . तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल फिसरे ग्रामपंचायतीच्या वतीने महाविद्यालयाला ट्रॉफी देण्यात आली. वृक्षारोपणानंतर व बेटी बचाव रॅलीनंतर समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मा . दिलीपजी स्वामीसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर , मा . जावेद शेख उप मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी मा . मनोज राऊत, मा . माने साहेब, डॉ .पिंपळे, गटशिक्षणाधिकारी मा . पाटील साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी. पाटील,उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , सरपंच प्रदीप दौंडे , उपसरपंच संदीप नेटके,उदयोजक भरत अवताडे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा . लक्ष्मण राख,यशवंत परिवारातील सदस्य,फिसरे गावातील ग्रामस्थ आणि एन .एस.एस. स्वयंसेवक उपस्थित होते .*
