ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा मध्ये काव्य मैफिल व तिळगूळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये महिला पालकांसाठी काव्य माहिती व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी निमंत्रित कवी म्हणून कवी प्रकाश तात्या लावून कवी हरिभाऊ हिरडे कवी खलील शेख कवी दादासाहेब पिसे कवयित्री डॉ. चारू देवकर यांना खास आमंत्रित केले होते.यावेळी त्यांना ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चे संस्थापक महेश निकत सर यांच्यातर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वांनी अप्रतिम कविता सादर केल्या त्यामध्ये पत्नी बद्दल तर काहींनी आई वडिलांवर तर काहींनी मुलींच्या हॉस्टेल वरील कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.यांच्या कविता ऐकून पालक वर्ग व इन्स्टिट्यूट मधील शिक्षिका प्रा. सौ. वाघमारे मॅडम यांनी भ्रूणहत्या वरती खूप छान कविता सादर केली. या कार्यक्रमा साठी तालुक्यातील 100-150 महिलांनी उपस्थीती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी संस्थेच्या संचालिका अश्विनी चव्हाण मॅडम व इतर सर्व सहकारी उपस्थित होत्या
