जलदिंडी २०२२ चे कोकरे आयलॅन्ड कुगाव येथे उत्साहात स्वागत…
सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण व अध्यात्म यांची सांगड घालणारी जलदिंडी दरवर्षी प्रमाणे आळंदी येथून माऊलींचे दर्शन घेऊन पंढरपूर च्या दिशेने सुमारे ४५० किमी चा पाण्यातील प्रवास करत पंढरपूर च्या दिशेने निघाली आहे. या जलदिंडीचे नदीच्या दोन्ही भागातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. ही वारकर्यांची दिंडी नदी किनारच्या गावांना नदी प्रदूषणाबाबत जागृत करते. शहरात होणारा प्लास्टिकचा प्रादुर्भाव आणि त्याचा जैवविविधतेवर होणारा परिणाम याबाबत माहिती देऊन जनजागृती करत आहे तसेच उजनी बॅकवाॅटर परिसरात पर्यटनाला कशा प्रकारे वाव आहे याबाबत जनजागृती करून प्रोच्छाहन देत आहे. ही जलदिंडी सन २००२ पासून आळंदी वरून पंढरपूरचा प्रवास गेली २१ वर्षे अविरतपणे चालू आहे. या जलदिंडीची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली असून इयत्ता आठवी च्या मराठी विषयामध्ये जलदिंडीचा प्रकरणाच्या रूपाने समावेश करून जलदिंडीचे प्रवर्तक डाॅ विश्वास येवले यांचा महाराष्ट्र शासनाने सन्मान केला आहे. यावर्षी ७ ऑक्टोबर २०२२ रोजी जलदिंडीचे कोकरे आयलॅन्ड कुगाव या ठिकाणी दुपारी १२.१५ वाजता आगमन झाले त्यावेळी कोकरे आयलॅन्ड चे संस्थापक मा श्री धुळाभाऊ कोकरे, कोकरे परिसरातील सदस्य व पंचक्रोशीतील इयत्ता आठवीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी जलदिंडीचे व जलदिंडीतील वारकरी बांधवांचे स्वागत केले.
