केत्तुर येथे ग्रामपंचायतीने औषधांची फवारणी करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी… ॲड .अजित विघ्ने यांची मागणी
केत्तुर प्रतिनिधी केत्तुर येथे ग्रामपंचायतीने औषधांची फवारणी करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी ॲड.अजित विघ्ने यांनी केली आहे. सध्या सततचा पाऊस पडत असुन, आपले केत्तुर -१ आणि २ येथे त्यामुळे डबकी साठली आहेत, तसेच गटार योजना व्यवस्थित नसल्याने बऱ्याच ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. सध्यस्थितीत आरोग्याचे दृष्टीने पाणी पुरवठ्याचे पाण्यात पावडर टाकणे, तसेच संपुर्ण गावात डास निर्मुलन करिता औषधे फवारणी ( फॉगिंग) करणेत यावे ग्रामस्थांचे आरोग्य बाबत, पाणी शुद्ध वापरणे व उकळुन घ्यावे व इतर बाबतीत जनजागरण करावे असे केत्तुर माजी. उपसरपंच ॲड अजित विघ्ने यांनी म्हटले असुन याची लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
