श्रीम.रा. बा सुराणा विद्यालयात स्पर्धा परीक्षाविषयक गेस्ट लेक्चर्सचे आयोजन
चिखलठाण ता.8 – चिखलठाण येथील श्रीम. रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय येथे आज रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत गेस्ट लेक्चर चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून अशोक उंबरे (निरीक्षक,धर्मादाय आयुक्त कार्यालय,पालघर) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजेंद्रकुमार बारकुंड (स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तथा मा.जि.प उपाध्यक्ष) हे होते.
कार्यक्रम प्रसंगी अशोक उंबरे यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी तसेच स्पर्धा परीक्षा संबंधित स्वतःचे अनुभव व्यक्त केले त्यासोबत विद्यार्थ्यांना जिद्द व चिकाटी च्या जोरावर अशक्य ही शक्य करता येऊ शकते हे स्पष्ट केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने, ज्येष्ठ शिक्षक शिवाजी मासाळ,धनंजय भोसले, गुरुकुल प्रकल्प प्रमुख साईनाथ लोहार,सहाय्यक प्रकल्प प्रमुख लक्ष्मण गोडगे,गेस्ट लेक्चर प्रमुख अशोक मुंडे, नवनाथ शेंडगे, रेवणनाथ जाधव, योगेश धस, बिभीषण भोई, प्रशांत गायकवाड, गणेश गव्हाणे, शंकरराव देशमुख, महादेव बिराजदार, विक्रम बारबोले, श्रीम.नूतन धुमाळ, श्रीम.सोनाली बुधकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ शेंडगे यांनी तर आभाप्रदर्शन शिवाजी मासाळ यांनी केले.
