हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम विकास परिषदेच्यावतीने करमाळा येथे विविध कार्यक्रम संपन्न -फारुक बेग अध्यक्ष मुस्लिम विकास परिषद
करमाळा प्रतिनिधी जगाला शांततेचा संदेश देणारे तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी करमाळा शहरातील मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष फारूक बेग यांनी दिली
पैगंबर जयंतीनिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने करमाळा शहरातील नगरपालिका उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच नगरपालिकेच्या वतीने दिलेला आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार कौसर सय्यद हिला मिळाल्याबद्दल तिचा मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने येथे सत्कार करण्यात आला यावेळी सदरच्या कार्यक्रमाला नगरसेवक संजय सावंत अमीर तांबोळी हाजी सादिक काजी एडवोकेट आलिम पठाण सुनील फुलारी जुबेर जानवडकर आझाद शेख साजिद बेग सद्दाम पठाण समीर शेख आजहर शेख अलीम शेख अश्फाक सय्यद शकील शेख हारुण वस्ताद हमीद सय्यद युसुफ शेख निगार मुंडेवाडीआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
तसेच करमाळा शहरातील मदरसा फैजूल कुराण येथे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले यावेळी मौलाना सय्यद अली मौलाना रेहान आलम तसेच कारी इस्माईल साहब आदी मान्यवर उपस्थित होते
एकंदर पाहता पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमाला करमाळा शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलासदर कार्यक्रमाचे आयोजक मुस्लिम विकास परिषदेचे फारूक बेग करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार यांनी केले होते.आभार आझाद शेख यांनी मानले.
