एन .एम .एस परीक्षेत रावगावचा चि.वैभव विलास काळेचे घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी
हडपसर येथील साधना माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. वैभव विलास काळे हा शैक्षणिक वर्ष 21- 22 मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एस. परीक्षेत मेरिटमध्ये येऊन घव घवीत यश प्राप्त केले आहे सदर विद्यार्थ्यास पुढील चार वर्ष महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे एकूण 48 हजार रुपये सदर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तो पात्र ठरलेला आहे सदर विद्यार्थी मूळचा करमाळा तालुक्यातील रावगाव या गावचा रहिवासी असून तो पुणे येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक श्री संतोष काळे सर यांचे त्यास मार्गदर्शन लाभले आहे त्याचा या यशा बद्दल रावगाव गावचे सरपंच श्री दादासाहेब जाधव , मकाई कारखान्याचे मा संचालक श्री प्रताप बरडे सर , पं स सदस्य श्री विलास मुळे , मुख्याध्यापक श्री कोळेकर सर , रासकर सर ,युवा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अमोल मुळे ,बाळासाहेब कानडे , श्री अंकुश काळे पाटील, यांनी अभिनंदन केले आहे.
