Friday, September 18, 2026
Latest:
करमाळा

चिरंजीव खुश संकेत खाटेर यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदवले शिखर शिंगणापूर चतुर्थ यात्रा संपन्न

करमाळा प्रतिनिधी खुश संकेत खाटेर याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर व श्री क्षेत्र गोंदवले चतुर्थ दर्शन यात्रेचे पौर्णिमेच्या दिवशी आयोजन करणेत आले  भगवताचार्य कौस्तुभजी रामदासी महाराज ( मिरज ), जैन समाजाचे अध्यक्ष चंद्रकांतजी कटारिया यांच्या हस्ते गाडीची पूजा करून यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भगवताचार्य कौस्तुभजी रामदासी महाराज यांनी यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या.आपले विचार व्यक्त करताना सांगितले की देवदर्शन यात्रा करणे पुण्याचे काम आहे पण यात्रा घडवून आणणे हें भ्याग वंताचे काम असून ते सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर करत असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच यात्रेला जाणाऱ्या भाविकांना पण आज च्या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.या यात्रेसाठी 115 भाविक सकाळी सहा वाजता रवाना झाले होते.
यावेळेस अँड. बाबुरावजी हिरडे,माजी नगरसेवक नारायण तात्या पवार ,पसंगराव साहेब, अनिल सोळंकी, जितेश कटारिया ,रनसिंग साहेब, नानासाहेब साळुंखे, नाथाजी शिंदे, कालिदास फंड, विनायक पवार, आप्पा झाकणे, पंढरीनाथ फंड, वैभव दोशी, प्रवीण मंडलेचा, बाळासाहेब महाजन, संतोष गुगळे, मुन्नाशेठ शिगची,अनंता मसलेकर, वर्धमान खाटेर, विजय बारीदे,यांचेसह नगरसेविका संगीता खाटेर, डॉ. सरोजनी महाजन, नलिनी जाधव, मंजू देवी, भरती देवी, सरिता सोळंकी, भरती बलदोटा, नीता सोळंकी, उषादेवी हिरडे, ज्योती मंडलेचा, ज्योसना लुनिया,उज्वला देवी, सुवर्णा बलदोटा यांचेसह अनेक पुरुष, महिला भाविक उपस्थित होते वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!