करमाळा तालुक्यातील पावसामूळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्यांचे त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याबाबत संभाजी ब्रिगेडचे निवेदन
करमाळा प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड च्या वतीने करमाळा तालुक्यातील पावसामूळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्यांचे त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याचे निवेदन नायब तहसीलदार लोकरे साहेब यांना देण्यात आले.करमाळा तालुक्यातील ढगफूटीमुळे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडास आलेला घास पावसाने हिरावून घेतला असून करमाळा तालुक्यातील राहिलेल्या सर्व गावाचे त्वरीत पंचनामे करून व समक्ष शेतकऱ्यांच्या बंधावर जाऊन सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी .अशी संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली .यावेळी सुहास पोळ (तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड करमाळा),नितीन खटके (संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष),बाळासाहेब घाडगे (रयत क्रांति तालुकाध्यक्ष करमाळा) ,अतुल निर्मळ(शहराध्यक्ष जेऊर),गणेश कुकडे (संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक),सोमनाथ जाधव , हेमंत शिंदे , अजित उपाधे , आदिनाथ माने , पांडुरंग घाडगे , अनिल कागदे व शेतकरी उपस्थित होते.


