Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या मानाच्या पालखीपैकी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे रावगाव येथे प्रशासनाच्यावतीने स्वागत*

करमाळा प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या मनाच्या पालखीपैकी करमाळा मार्गे येणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे रावगाव येथे प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी प्रियंकाताई आंबेकर मॅडम तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकडे मॅडम यांनी स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगेसाहेब व गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथून श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरला जात आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता सोलापूर जिल्ह्यात या पालखीचे आगमन झाले. यावेळी श्रींच्या पादुका पूजन तहसीलदार शिल्पाताई ठोकडेमॅडम, पोलिस निरीक्षक विनोद घुगेसाहेब व गटविकास अधिकारी राऊत यांच्या हस्ते झाले. यावर्षी पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने निघाला आहे. या पालखी सोहळ्यात 25 हजार वारकरी आहे. त्यांच्यासोबत ४५ दिंड्या आहेत. तोफांच्या सलामीत पालखींचे रावगावच्या वेशीवर आगमन होताच सरपंच संदिप शेळके, ग्रामविकास अधिकारी रामदास हजारे यांनी पादुका पूजन व संस्थान अध्यक्ष हभप भाऊसाहेब महाराज गंभीरे, पालखी चालक हभप मोहन महाराज बेलापूरकर, पुजारी हभप जयंत महाराज गोसावी यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. आरोग्य विभाग, महावितरण विभाग, पोलिस प्रशासन यांनी यावेळी चोख नियोजन केले आहे.अभियंता रघुनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे एक पथक गावात सक्रिय आहे. वीज अखंडपणे सुरु राहावी यासाठी पथक परिश्रम घेत आहे. पोलिस स्टेशन करमाळा यांच्या वतीने योग्य व सुनियोजन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील याविषयी दक्षता घेतली. पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी भोंग, विस्तार अधिकारी पाटील, गाव कामगार तलाठी अनभूले, तालूका कृषी अधिकारी संजय वाकडे, सार्वजनिक बांधकाम विभाग जाधव, पाणी पुरवठा विभाग, तालूका अरोग्य अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, गावकामगार पोलिस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group