दत्तकला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी मोहिते हिने २२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर उशु स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवत यशाचे शिखरं केले पादाक्रांत
करमाळा प्रतिनिधी *दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनीचे २२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर उशु स्पर्धेत कु वैष्णवी मोहिते हिने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
दिनांक ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑल इंडिया उशु फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या 22 व्या राष्ट्रीय ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धा. बिहार पटना येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहाने पार पडल्या. या स्पर्धेत दत्तकला इंटरनॅशनल स्कूल ची इयत्ता अकरावी सायन्स ची विद्यार्थिनी *वैष्णवी तुषार मोहिते* हिने 56 किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक मिळविला .
*या विजेते विद्यार्थी ला मार्गदर्शन क्रीडाशिक्षक प्रदीप सुनील शिवपुजे सर यांनी केले. या विद्यार्थिनीचे अभिनंदन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक माननीय रामदास झोळ सर, उपाध्यक्ष माननीय राणा दादा सूर्यवंशी सर, सचिवा सौ.माया झोळ मॅडम, प्राचार्य सौ. नंदा ताटे मॅडम प्राचार्य सौ. सिंधू यादव मॅडम प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी विद्यार्थिनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.