करमाळा तालुक्यातील केम परिसरात जोरदार पाऊसाने नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान शासनाने पंचनामे करुन मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी
केम प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम परिसरात गुरुवार दि.६ ऑक्टो. रोजी रात्री दोनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परीसरातील शेतीसह केम येथील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या वीस वर्षांत असा जोरदार पाऊस पडला नाही, अशी चर्चा ग्रामस्थ करत असल्याचे दिसून आले.
रात्रीच्या वेळी बरसलेल्या या जोरदार पावसामुळे रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले तसेच ओढ्यावरील पुल पाण्याखाली गेला. पुलाजवळ असणा-या आशिर्वाद ॲग्रो सर्व्हिसेस या दुकानात पाणी शिरल्याने रासायनिक खते, औषधे, फर्निचर पाण्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. रोडच्या बाजूला असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या दुकानांतील माल भिजुन खराब झाला आहे.. महादेव पाटमास यांच्या वर्कशॉप मधील मशीन पाण्यात वाहून गेल्या आहेत त्यामुळे त्यांचे सुमारे दोन लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे.शुक्रवार दि.७ रोजी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी वाकडे, तलाठी प्रमोद चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतांतील पाणी अद्याप ओसरले नसल्याने दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे केले जातील, असे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.केम येथे अतिवृष्टी पावसाचा हाहाकार नागरिकांचे झाले असुुन नुकसान केमचे ग्रामदैवत उत्तरेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या पायरीला पाणी लागले आहे केम येथे येणारे सर्वच रस्ते पाण्याखाली गेले आहेत एस टी महामंडळाची सेवा बंद करण्यात आले आहे हात्ती नक्षत्राच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित चालू करावे अशी मागणी केम येथील ग्रामस्थांनी केली आहे आमचे प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेेेेत.
पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी सरपंच अजित तळेकर, ‘प्रहार’चे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, संपर्क प्रमुख सागर पवार, भाजपचे तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे यांच्यासह केम परिसरातील शेतकरी, व्यापारी व छोटे व्यावसायिक यांनी कृषी अधिकारी, तहसीलदार समीर माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
