Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय युवा मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातुन 50 गाड्या जाणार -निखिल चांदगुडे

करमाळा प्रतिनिधी करमाळ्यात युवासेना शिंदे गटाची बैठक झाली. २४ तारखेला मुबंईत होणाऱ्या युवासेनेच्या राज्यस्तरीय मेळावाचे नियोजन झाले आहे .करमाळा तालुक्यातून तब्बल ५० गाडयांचा ताफा मेळाव्यासाठी जाणार आहे  असे युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी सांगितले  पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून युवसैनिक जाणार आहेत.मा.खा.श्रीकांत शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,सचिव किरण साळी,सचिव दीपेश म्हात्रे, सचिव ऋतुराज क्षिरसागर यांचा अध्यक्षतेखाली हा महामेळावा संपन्न हणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत आगामी काळातील निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा झाली व पक्षवाढीचे नियोजन आखण्यात आले.
कार्यक्रमात युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,निखिल चांदगुडे,विशाल गायकवाड,नवनाथ गुंड,राहुल कानगुडे,निलेश मद्दे,संतोष सोरटे,आदित्य जाधव,अजिनाथ भोसले,सुनील पवार,भैय्या बरडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group