जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
श्री भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे येथे शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित निवृत्त पोलीस निरीक्षक धर्मराज आवटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले यांनी स्फूर्तीदायी भाषणातून मुलांना शिवरायांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत हे पटवून दिले. तानाजी हरणावळ यांनी मुलांची लेझीम घेतले व त्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी लेझीम मधील मुलांना एक हजार रुपये रोख रक्कम बक्षीस जाहीर केले. त्यानंतर शिवरायांच्या जीवनावर मुलांनी त्यांचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमा वेळी मुलांनी शिवाजी महाराज की जय आशा घोषणा दिल्या. इयत्ता सातवीच्या मुलींनी शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव युवराज बिले व कार्यक्रमासाठी सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेच्या संचालिका डॉक्टर स्वाती बिले उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता साळुंके व आभार सतीश कोंडलकर यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब खराडे व इतर शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला.
