Uncategorized

हमाल तोलार कामगारांचा विविध मागण्यासाठी  26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  -ॲड. राहुल सावंत आमदार मा. संजयमामा शिंदे यांना करमाळा तालुका हमाल पंचायतच्यावतीने निवेदन 

करमाळा प्रतिनिधी:- माथाडी कायदा संपुष्टात आणणारे परिपत्रक मागे घ्या अन्यथा मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती ॲड. राहुल सावंत ( सदस्य, जिल्हा नियोजन समिती सोलापूर व अध्यक्ष, हमाल पंचायत करमाळा ) यांनी दिली आहे.

          सोलापूर जिल्ह्यातील विविध हमाल तोलार कामगार संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 2024 रोजी राज्याचे कामगार नेते डॉ. बाबा आढाव, नरेंद्र पाटील व इतर कामगार संघटनेचे नेते मुंबई येथील आझाद मैदानावर माथाडी कायदा वाचवण्यासाठी व माथाडी कायदा सुधारण्याच्या नावाने आणलेले विधेयक हे माथाडी कामगार विरोधी असल्याकारणाने ते तात्काळ रद्द करण्याबाबत व कामगारांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण व आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील हमाल तोलार एक दिवस या कामकाज बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सोलापूर जिल्ह्यातील समवेत करमाळा येथील हमाल तोलार कामगार मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजता भव्य मोर्चा काढून आंदोलन करून मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतता मार्गाने मोर्चा काढत आहे. या मोर्चामध्ये करमाळा तालुका हमाल पंचायत येथील हमाल तोलार एक दिवसीय कामकाज बंद ठेवून या मोर्चामध्ये सहभागी होत आहे. 

         या आंदोलनाचे निवेदन मा.मुख्यमंत्री सो., मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेब , मा. उपमुख्यमंत्री साहेब, मा. कामगार मंत्री सो , मा. आमदार संजय मामा शिंदे साहेब करमाळा , मा . जिल्हाधिकारी साहेब सोलापूर , मा. चेअरमन सो सोलापूर जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ व साहेब कामगार आयुक्त सोलापूर, मा .जिल्हा सहाय्यक निबंधक सोलापूर, मा. तहसीलदार साहेब करमाळा , मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो.करमाळा, मा .पोलीस निरीक्षक साहेब करमाळा , मा.सभापती/ सचिव सो कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा यांना देण्यात आले.

 

चौकट : – माथाडी कायदा संपुष्टात आणणारे परिपत्रक मागे घ्या असे निवेदन करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने आमदार संजय मामा शिंदे यांना देण्यात आले. यावेळी आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी याबाबत चर्चा करून प्रयत्न करतो असे आश्वासन शिष्टमंडळ ॲड . राहुल सावंत, गजानन गावडे, वालचंद रोडगे, संतोष कुकडे, संजय नलवडे, ज्ञानेश्वर गोसावी, उमेश अंधारे, अनिल रासकर यांना देण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group