करमाळा तालुका महिला शिवसेना आघाडीप्रमुखपदी वर्षाताई चव्हाण शिवसेना करमाळा माढा विधानसभा महिला संघटकपदी साधनाताई खरात यांची निवड

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदी केम येथील धडाडीच्या कार्यकर्त्या वर्षाताई चव्हाण यांची निवड सोलापूर जिल्हा शिवसेना महिला संघटक शैलाताई गोडसे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. याच बरोबर करमाळा-माढा विधानसभा शिवसेना महिला संघटकपदी मांजरगावच्या माजी सरपंच साधनाताई खरात यांची निवड शैलाताई गोडसे यांच्या हस्ते करण्यात आली. केम शाखा महिला प्रमुखपदी आशाताई मोरे यांची निवड करण्यात. वर्षाताई चव्हाण यांना महिला तालुकाध्यक्षपदाचे अधिकृत पत्र, तसेच साधनाताई चव्हाण यांना विधानसभा मतदारसंघाच्या महिला संघटकपदाचे अधिकृतपत्र शैलाताई गोडसे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी करमाळा तालुक्याच्या स्वाभिमानी नेत्या सौ. रश्मी दिदी बागल यांनी या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले असून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
