गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेवर वसुबारनिमित्त गोमातेची पूजा मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात संप्पन
करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेवर 17 ऑक्टोंबर रोजी वसुबारस निमित्त गोमातेची पूजा मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली यावेळेस गोमाता गोपालन संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक शेठ खाटेर यांनी सर्वांचे स्वागत करून गोपालन संस्थेविषयी आपले विचार व्यक्त केले तसेच सरिता भाभी सोळंकी यांनीही गोपालन संस्थेला शुभेच्छा दिल्या संस्थेचे जगदीश जी सिकची यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्याबरोबर कुलकर्णी साहेब पण या कार्यक्रमाला उपस्थित होते गोमातेला बाजरीची भाकरी राळेचा भात आणि गवारीची भाजी व गुळ यांचा नैवेद्य दाखवण्यात आला सर्व उपस्थित त्यांनी गोमातेचे पूजा केली गोपालन समितीचे सर्व सदस्य व झोळ सरांनी पाठवलेले सर्व दत्तकला ग्रुप चे सभासद यांनी गोमातेला चारा घालून छान पद्धतीने वसुबारस साजरी करण्यात आली आजच्या या कार्यक्रमाला गोसेवा समितीचे अनिलजी सोळंकी सरिताजी सोळंकी यांचा सर्व परिवार आशिष जी बोरा दिनेश जी मुथा बँक इन्स्पेक्टर शंकरजी रासकर साहेब वैभवजी दोशी व सर्व खाटेर परिवार तसेच गोमातेची वीस वर्षापासून सेवा करणारे पोपटराव काळदाते व त्यांचा परिवार या सर्वांचे वतीने पूजा करून वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गोपालन संस्थेचे सर्व सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते श्रावक संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत जी कटारिया व त्यांचा परिवार ही उपस्थित होता संस्थेचे अध्यक्ष श्री श्रेणिक शेठ खाटेर यांनी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.


