कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस यांच्यावतीने आळजापुर येथील शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप शेतकऱ्यांची संकटात दिवाळी झाली गोड
*
करमाळा प्रतिनिधी कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स करमाळा यांच्यावतीने आळजापुर येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त व पूरग्रस्त पूर परिस्थितीतून दिलासा देण्यासाठी सण साजरा करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना रोख स्वरूपात बोनस चे वाटप करण्यात आले. या बोनसचे वाटप कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे सर्वेसर्वा डॉ .विशाल केवारे यांच्या हस्ते चेक द्वारे पावणेतीन लाख रुपयाची चेक स्वरूपात वाटप करण्यात आले. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांच्यावतीने मदतीचा एक हात म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोख स्वरूपात चेक द्वारे शेतकऱ्यांना पैशाचे वाटप केल्यामुळे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी यांची दिवाळी गोड झाली असून सर्व शेतकऱ्यांनी कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे आभार मानून कौतुक केले आहे. या कार्यक्रमास उद्योजक लालासाहेब काळे , कमलाई डेअरीचे मॅनेजर अजय लगस दुध उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


