करमाळ्यामध्ये विविध मोठे औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना मताधिक्य द्यावे – उद्योगमंत्री उदय सामंत
करमाळा प्रतिनिधी मागील लोकप्रतिनिधी तरूणांना रोजगार मिळावा यासाठी काही करू शकले नाही.दिग्विजय दिगंबरराव बागल हे तरूण आणि सर्वसामान्यांविषयी तळमळ असणारे नेतृत्व असून राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेत येणार आहे , मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी करमाळा येथे औद्योगिक विकास व्हावा, मोठे उद्योग करमाळ्यात उभे रहावेत यासाठी करमाळा-माढा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबराव बागल यांना विजयी करण्यासाठी व विधानसभेत जाण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन मा.सामंत यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा प्रदेश उपाध्यक्षा मा.रश्मी दिदीसाहेब बागल, विलासरावजी घुमरे सर, शिवसेनेचे महेशजी चिवटे , मा. मंगेशजी चिवटे, प्रियांकाताई गायकवाड, दादासाहेब तनपुरे, रमेश आण्णा कांबळे तसेच महायुती घटक पक्षाचे अन्य पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
