Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुका खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्ष पदी जगताप गटाचे महादेव डुबल

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्ष पदी जगताप गटाचे निष्ठावंत समर्थक महादेव डुबल यांची बिनविरोध निवड झाली आहे . बैठकीच्या अध्यक्ष स्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप होते . याप्रसंगी संघाचे मार्गदर्शक संचालक तथा माजी आमदार जयवंतराव जगताप , संचालक शहाजी शिंगटे , दादासाहेब लबडे , मज्जीद खान , किशोर भगत , वैजीनाथ कदम , संभाजी रिटे , दादासाहेब कोकरे , महेश कांबळे , हनुमंत ढेरे , बबन मेहेर , महादेव धोंडे यांचे सह मार्केट कमिटीचे संचालक जनार्धन नलवडे , तात्यासाहेब शिंदे , रामदास गुंडगीरे , शिवाजी राखुंडे , महादेव कामटे ,करमाळ्याचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे , हरीदास डुबल , छबनराव जाधव , बबुशा केकान , संघाचे व्यवस्थापक विठ्ठल तोरणे , दादासाहेब पुजारी , डिसीसी बँकेचे सिनीयर बँक इन्स्पेक्टर आण्णा आवटे , अनिल सुरवसे , दिगंबर रासकर आदी उपस्थित होते . निवडीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप , अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी डुबल यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या . खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी डुबल यांची निवड झाल्यामुळे कंदर व बिटरगाव वांगी परिसरात त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group