करमाळा

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होणार असल्याने महाराष्ट्रातील विकासाला नवीन दिशा मिळणार असुन करमाळा तालुक्यातील एमआयडीसीचाही प्रश्न मार्गी लागेल-संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी  देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री होणार असल्याने महाराष्ट्रातील विकासाला नवीन दिशा मिळणार असुन करमाळा तालुक्यातील एमआयडीसीचाही प्रश्न मार्गी लागेल असे मत भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी सर्वानुमते आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झाली व त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग सुकर झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाके वाजून आनंदोत्सव साजरा केला यावेळी करमाळा येथील एमआयडीसीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल असा विश्वास संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!