विधानपरिषद शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या उपस्थितीमध्ये जयप्रकाश पब्लिक स्कूल झरे येथे 41 शाळांना प्रिंटरचे वितरण संप्पन
करमाळा प्रतिनिधी पुणे विभागाचे विधान परिषदेचे शिक्षक आमदार माननीय जयंत आसगांवकर हे करमाळा,माढा बार्शी तालुक्यातील अनुदानित त्यांच्या आमदार फंडातून प्रिंटर वितरण समारंभासाठी जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे तालुका करमाळा येथे उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश होते. यावेळी 41 शाळांना प्रिंटरचे वाटप माननीय आमदार जयंत आसगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्वयंअर्थ तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थापक अध्यक्ष, सचिव ,पदाधिकारी यांनी त्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात निवेदन दिले. आमदार आसगावकर यांनी अनुदानित विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन दरबारी प्रयत्नशील राहणार आहोत असे स्पष्ट केले. मी सामान्य आमदार असून कोणत्याही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालकांचा येणारा कॉल स्वीकारतो ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ‘ हे माझे कामकाजाचे धोरण आहे. माननीय आमदार जयंत आसगावकर हे शिक्षकांचे प्रश्न आपुलकीने सोडवत असून त्यांच्या पाठीशी संस्थाचालक व शिक्षक खंबीरपणे उभे राहतील असे
प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. यावेळी सचिन झाडबुके, मुख्याध्यापक नीळ, श्री गायकवाड सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव युवराज बिले, प्रा.राजेश शिंदे उपस्थित होते. तसेच तिन्ही तालुक्यातील मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरी चावरे व नम्रता पवार यांनी केले.
