वाशिंबे येथील नळ पाणीपुरवठा योजने करिता ८६ लाख रुपये निधी मंजूर… सरपंच तानाजी झोळ यांची माहिती.
प्रतिनिधी वाशिंबे
वाशिंबे ता.करमाळा येथील नळ पाणीपुरवठा योजने करिता महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नाने ८६ लाख रुपये निधी मंजूर झाला असुन येत्या दोन महिन्यात योजनेच्या कामास सुरुवात होईल अशी माहिती वाशिंबे ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी झोळ यांनी दीली आहे.
यावेळी झोळ यांनी बोलताना सांगितले की आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडे वाशिंबे सह परिसरातील विविध विकास कामांसाठी पाठपुरावा सुरूआहे.शिक्षण,आरोग्य,रस्ते,वीज,पाणीपुरवठा या प्रश्नासंदर्भात लवकरच सकारात्मक व ठोस निर्णय समोर येतील. सदर नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांचे वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले आहेत
