करमाळाराजकीय

युवासेना करमाळा तालुका प्रमुख पदी शंभुराजे फरतडे तर शहरप्रमुख पदी समीर परदेशी यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुका शिवसेना युवासेनेच्या तालुका प्रमुख पदी शंभुराजे शाहुराव फरतडे तर शहर प्रमुख पदी समीर परदेसी यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै सामना मधून हि निवड जाहीर केली आहे.

या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असून काम बघून सहा महिन्यानंतर कायम करण्यात येतील असे युविसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकात म्हटले आहे.

या निवडीबद्दल विभागीय सचिव अक्षय ढोबळे माढा लोकसभा विस्तारक उत्तम आयवळे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड शहर प्रमुख प्रवीण कटारीया संघटक संजय शिंदे माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवासेना युवासेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, युवती सेना जिल्हा प्रमुख साक्षी भिसे ,उपशहरप्रमुख प्रमुख प्रसाद निंबाळकर आदींनी अभिनंदन केले आहे.शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात लवकर युवासेनेची नव्याने बांधणी करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख शहर प्रमुख यांनी जाहीर केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group