करमाळा तालुक्यातील 108 गावांपर्यंत योग पोहोचवून प्रत्येक नागरिक शारीरिक मानसिक आणि बौद्धिक सुदृढ बनवण्यासाठी योग सर्वोत्तम उपाय असून संपूर्ण करमाळा योगमय झाला पाहिजे – प्रीतेश लाड…(युवा महाराष्ट्र राज्य प्रभारी)
करमाळा प्रतिनिधी.करमाळा तालुक्यातील 108 गावांपर्यंत योग पोहोचवून प्रत्येक नागरिक शारीरिक मानसिक आणि बौद्धिक सुदृढ बनवण्यासाठी योग सर्वोत्तम उपाय आहे संपूर्ण करमाळा तालुका योगमय झाला पाहिजे असे मत पतंजली योग समितीचे महाराष्ट्र राज्य युवा प्रभारी प्रितेश लाड यांनी व्यक्त केले. त्यासाठी आपण सर्वजण मिळून एक दिलाने काम करणे गरजेचे आहे. रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी करमाळा येथे झालेल्या पतंजली योग समिती यांच्या जिल्हा बैठकीत पतंजली परिवारातील सर्व योगशिक्षक, योग साधक यांना मार्गदर्शन केले पुढे बोलताना ते म्हणाले की.परमपूज्य संदेश स्वामी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या पतंजली योग समिती सोलापूर आणि करमाळा समितीच्या वतीने प्रत्येक गावात योग शिबिर लावून आसन, प्राणायाम ध्यान, नशामुक्ति, स्वदेशी चिकित्सा, वृक्षारोपण इत्यादी माध्यमातून आदर्श गाव बनवूया. आपल्या प्रभावी ओघवत्या रसाळ वाणींनी त्यांनी सर्व उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर पतंजली योग समितीचे जिल्हा भारत प्रभारी सुरेंद्र पिसे आणि संतोष दुधाळ जिल्हा संवाद प्रभारी मधुकर सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनंदन भुतडा, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी ,भगवान बनसोडे, जिल्हा संघटन मंत्री प्रकाश जाधव मोहोळ भारत स्वाभिमान तालुका प्रभारी विजय कांबळे इत्यादी उपस्थित होते. यावेळी कमला भवानी बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या वतीने योग सेवेत अखंड योगदान दिलेल्या आणि समाजात आरोग्य ,शांती व सद्भावना निर्माण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अशोक बरडे, चंद्रकांत वीर, संध्या बिले, रेशमा जाधव, संध्या थोरे, संतोष पोतदार, निशिगंधा शेंडे, प्रदीप नलावडे इत्यादी योग गुरूंचा अतिथी मान्यवराच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यकारी आढावा बैठकीदरम्यान माननीय श्री प्रीतीश जी लाड यांच्या सूचनेनुसार तालुक्याची निवड समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये प्राचार्य बाळासाहेब नरारे यांची भारत स्वाभिमान न्यास तालुका प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर हनुमान सिंग परदेशी पतंजली योग समिती तालुका प्रभारी , प्राचार्य जयप्रकाश बिले किसन सेवा समिती तालुका प्रभारी, अशोक बरडे किसन सेवा सहप्रभारी, संकेत खाटेर युवा भारत तालुका प्रभारी, प्रवीण देवी युवा भारत सह प्रभारी, अजित नरसाळे सोशल मीडिया तालुका प्रभारी आणि संतोष पोतदार यांची सोशल मीडिया सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत वीर, प्रवीण देवी, ललित अग्रवाल, डॉ श्रीराम परदेशी, रंदवे गुरुजी, राजेंद्र परदेशी इत्यादींची वेगवेगळ्या उप समित्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आजी-माजी पदाधिकारी आणि सर्व योगसाधक योगसाधक , आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री उपाध्याय यांनी सूत्रसंचालन तर आभार महिला महामंत्री सौ माधुरीताई साखरे यांनी मानले.


