करमाळा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या स्वागतासाठी पुर्व भागातुन पाचशे मोटर सायकलसह कार्यकर्ते सहभागी होणार- अमोल फरतडे

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार ‌ 24 सप्टेंबरला ‌ करमाळा दौऱ्यावर ‌ येत असून ‌ यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात येणार असून करमाळा तालुक्यातील ‌ पूर्व भागातून पाचशे मोटर सायकलसह कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष ‌ अमोल फरतडे यांनी सांगितले आहे. करमाळा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ‌ संजय मामा शिंदे ‌ यांच्या माध्यमातून ‌ विकास कामे ‌ मोठ्या प्रमाणात चालू असून ‌ दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणारा ‌ पूर्व भाग ‌ मामाने दहिगाव उपसा सिंचनचे पाणी ‌ देऊन सर्व भाग सुजलाम सुफलाम बागायत केला आहे. त्यामुळे येथील शेतकरी नागरिकाचे जीवनमान उंचावले असून ‌ करमाळा तालुका आमदार संजय मामा शिंदे ‌ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे‌ खंबीरपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनीही करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले काम केले असून पूर्वभागातून संजयमामाच्या सहकार्यातून भरीव विकास काम केले आहेत. त्यामुळे ‌ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या ‌ स्वागत मोटरसायकल रॅलीमध्ये पाचशे मोटर सायकलसह ‌ नागरिक ‌ उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अजित दादांचे स्वागत करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल फडतरे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!