यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105 वी जयंती यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये संपन्न झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन केले. याप्रंसगी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मा.प्राचार्य मिलिंद फंड यांनी स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी उजनी धरण, मांगी धरण, कुकडी प्रकल्प कशा पद्धतीने राबवले. त्याचबरोबर तालुक्यातील गोरगरिब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची स्थापना केली असे आपल्या मनोगतातून स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांच्या विषयी गौरउद्गार काढले .
या कार्यक्रमासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव आदरणीय श्री. विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाच्या डॉ. वंदना भाग्यवंत यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रा.हनुमंत भोंग यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.