सोलापूर जिल्ह्याला कोव्हीड निधी कमी पडु देणार नाही गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे करमाळा येथील जिल्हास्तरीय अधिकारी आढावा बैठकीत प्रतिपादन

करमाळा प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून सोलापूर जिल्ह्यामध्ये या कोरानाचा प्रादृभाव वाढू नये म्हणून प्रशासनाने एकजुटीने काम करावे सोलापूर जिल्हा कोव्हीड साठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आपण आमचे सर्व लोकप्रतिनिधी काम करीत असून सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले आहे. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले करमाळ्यातील शेतकऱ्यांना हमी भाव केंद्र सुरू करण्यासाठीचे व खाजगी बँका फायनान्सला वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करीत असून जनतेनी यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोना काळात उत्कृष्ट पध्दतीने कर्तव्य बजावणाऱ्या करमाळा पोलिसांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बंदी शिथील केल्यानंतर मुंबई पुणे व कोरोना बाधीत भागातुन मोठ्या प्रमाणात सोलापुर व जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे कोरोनाचा प्रादृभाव वाढला आहे. त्यावर प्रशासनाचे व सरकारचे काम चालू असून बेडची संख्या वाढवण्याबरोबर कोरोना चाचणीचे कीट मागणीनुसार उपलब्ध करुन देऊन सर्व सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
शनिवार दि.२५ जुलै रोजी जिल्हास्तरीय कोरोना संदर्भात अधिकारी आढावा बैठक तहसील करमाळा येथे मा. ना.शंभूराजे शिवाजीराव देसाई गृहमंत्री(ग्रामीण),वित्त,नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,नगराध्यक्ष वैभवराजे जगताप,पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे,जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचल,प्रांत अधिकारी ज्योती कदम,उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ विशाल हिरे,तहसीलदार समीर माने व करमाळा पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित निमकर तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभिगाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
