शिवसेना नेते महाराष्ट्र राज्याचे पणन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची माजी आमदार नारायण आबा पाटील व त्यांच्या कुटुंबीयांस सांत्वनपर भेट

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पणन गृहराज्यमंत्री मा.शंभुराजे देसाई यांनी करमाळा तालुक्याचे शिवसेनेचे मा. आमदार नारायण ( आबा ) पाटील यांचे पिताश्री कर्मयोगी गोविंद ( बापू ) पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने लव्हे येथे सांत्वन पर भेट घेऊन पाटील कुटुंब परिवाराचे सांत्वन केले. या प्रसंगी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा कांबळे,जि. प.सदस्य बिभीषण आवटे,शिवसेनेचे वैद्यकीय कक्षप्रमुख पत्रकार मंगेश चिवटे,सभापती गहिनीनाथ ननवरे, उप सभापती दत्ता सरडे,मा.सभापती शेखर गाडे,प.सं. सदस्य अतुल पाटील,बाजारसमितीचे सभापती शिवाजीराव बंडगर,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख प्रविण कटारिया,अजित दादा तळेकर, अमरजीत साळुंखे, जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
