करमाळासहकारसाखरउद्योग

मकाईच्या सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सभासदाचे ऊस बिल पुढील आठवड्यात जमा होणार – दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखाना लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांनी स्थापन केलेल्या कारखाना असून सभासद विश्वास व सहकार्यावर मकाईची वाटचाल सुरू आहे या विश्वासाला स्वर्गीय डिगामामाचा मुलगा या नात्याने मी व आपल्या नेत्यां आदरणीय रश्मी दिदीबागल आयुष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही सभासदाची ऊस बिल पुढील आठवड्यात निश्चित जमा होतील याची हमी देतो मकाईसाठी कोणताही त्याग करण्याची आमची तयारी असल्याची भावनिक उदगार बागल गटाचे युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी मकाई कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केले .वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत व खेळीमळीच्या वातावरणात संपन्न झाली तत्पूर्वी मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री लोकनेते स्व. दिगंबराजी बागल मामा यांच्या पुतळ्याची विधीवत पूजन कोर्टी गावचे पोलीस पाटील खंडेराव शेरे यांच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थित झाले. सभेचे प्रारंभी कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय दिगंबरा बागल मामा यासह अहवाल वर्षांमध्ये दिवंगत झालेल्या सर्व क्षेत्रातील स्तरातील व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली .या ठरावाचे वाचन कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी केले. तर विषय पत्रिकेचे वाचन कारखान्याची विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी केले उपस्थित सभासदांनी त्याला एकमुखाने मंजुरी दिली या सभेस मकाईचे सर्व संचालक मंडळ आदिनाथचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे आजिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे माजी संचालक मोहन गुळवे दत्ताभाऊ गायकवाड माजी उपसभापती लालासाहेब पाटील माजी संचालक बापूराव कदम माजी संचालक एडवोकेट दत्तात्रय सोनवणे बाजार समितीचे नूतन संचालक काशिनाथ काकडे आदीसह सभासद बागल गटाचे मुख्य कार्यकर्ते हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अधिक बोलताना दिग्विजय बागल यांनी कारखान्याच्या सध्याचे काळात कसोटीच्या काळात सन्माननीय सभासदांनी आम्हास समजून घेतले आहे हा विश्वास त्यांचा मकाईवर आहे याचा अभिमान वाटतो सभासदाच्या ऊसबिलाची रक्कम मंजूर करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मंत्रालयीन पातळीवर आपले नेत्या आदरणीय रश्मी दीदी बागल अथक प्रयत्नशील आहे .सध्या पाच दिवस शासकीय सुट्टी असल्याने दिनांक 3 आक्टोंबर नंतर बिलाच्या कामाला गती मिळेल व सभासदांच्या ऊस बिल मिळतील याची मी ग्वाही येतो बँकांचे कागदपत्रे व त्याची आवश्यक पूर्तता करणे व इतर बाबीमुळे निश्चितच उशीर झाला आहे. हे आम्ही मान्य करतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून अनेक सभासदांना वेळेवर पैसे न मिळाल्याने कोणाचे दवाखाना कोणाची शाळा महाविद्यालय प्रवेश अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले परंतु सभासदांनी आम्हाला जे सहकार्य केले ते विसरू शकत नाही असे नम्रपणे नमूद केले मकाईची उभारणी स्वर्गीय मामांनी केली आहे .त्याच्या वैभवासाठी प्रगतीसाठी मी व माझे कुटुंबप्रसंगी कोणताही त्याग करू पण सभासदांचे देणे आम्ही देण्यासाठी कटीबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. अनेक जण कामात सहकार्य करण्याऐवजी मुद्दाम राजकीय हेतुने अडथळे आणण्याचे काम करत आहेत .जे साधे गुर्हाळ चालू शकले नाहीत त्यांनी सहकारी साखर कारखान्याबाबत बोलणे म्हणजे हास्यस्पद व केवळ स्टंटबाजी आहे. या पुढील काळाचे सहन केले जाणार नाही .कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. आम्ही केवळ विश्वस्त म्हणून काम करत आहोत. आमच्याकडे लोकशाही आहे आम्हाला आमच्या घरी कार्यालयात येऊन सभासद प्रश्न विचारू शकतात ही कामाची पद्धत व पारदर्शीपणा आमच्याकडे आहे. मी कोणाचेही नाव घेणार नाही आणि नाही नाव घेऊन उगाच मोठे करणार नाही कारखान्याची भविष्यातील वाटचाल आपल्या नेते आदरणीय रश्मी दीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व सभासदांच्या आशीर्वादाने निश्चितपणे उज्वल राहिल याची मी खात्री देतो. यावेळी आभार संचालक सतीश नीळ यांनी मानले तर शेखर जोगळेकर राष्ट्रगीत जाऊन सभा समाप्त झाली सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक लहू बनसोडे यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group