Saturday, April 26, 2025
Latest:
करमाळा

आदिनाथप्रमाणे मकाई कारखाना सहकारी तत्त्वावर राहण्यासाठी आपण कार्यरत असुन मकाई कारखान्याबाबत दिग्विजय बागल यांचा स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न -प्रा.रामदास झोळ

. करमाळा प्रतिनिधी आदिनाथप्रमाणे मकाई कारखाना सहकारी तत्त्वावर राहण्यासाठी आपण कार्यरत असुन आदिनाथ कारखाना सहकारी तत्वावर ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नाला यश मिळाले असुन मकाई कारखान्याबाबत याच भुमिकेतुन आपण काम करत असुन स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न दिग्विजय बागल करत असल्याचे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये दिग्विजय बागल यांनी स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न केला.थकलेली शेतकऱ्याची ऊस बिले ,वाहतूकदाराची बिले कधी देणार चालू हंगामात कारखाना सुरू करणार की नाही गाळप झालेल्या साखरचे काय केले बॅगेस माॅलीसिसचे काय झाले त्याचे पैसे काय केले या विषयावर त्यांनी बोलणे अपेक्षित होते परंतु त्यांनी या विषयावर न बोलता कोणाच्या तरी सांगण्यावरून बँकेने आम्हाला कर्ज दिले नाही त्यामुळे आम्ही शेतकऱ्याची बिल देऊ शकलो नाही असे सांगितले यामध्ये सरळ सरळ त्यांनी आपला आपले अपयश झाकून दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. माझी भूमिका आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालू अशीच होती तीच भूमिका मकाईच्या बाबतीतही मकाई व्यवस्थित चालवला तर माझे त्यासाठी सहकार्य राहील परंतु मकाई अडचणीत यावा अशी आपली भूमिका कदापिही नाही परंतु दिग्विजय बागल यांनी एक हाती सत्ता असतानाही सहकारी तत्त्वावर कारखाना व्यवस्थित चालवता आला नाही. आज हे पूर्ण तालुक्याने पाहिले आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कर्ज न मिळाल्याचे कारण सांगितले त्यामुळे आम्ही बिल देऊ शकलो नाही असे सांगितले आहे. जर कारखान्याकडे साखर शिल्लक असतील तर कोणतीही बँकेने कर्ज दिले असते परंतु आता मकाई कारखान्याकडे साखर शिल्लक नसल्यामुळे कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नाही परंतु सत्य सांगण्याची हिंमत दिग्विजय बागल यांच्याकडे नाही त्यामुळे त्यांनी आपल्या अपयशाचे खापर इतरावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आजच्या मकाई सर्वसाधारण सभेत केला असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group