सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन जगावे-डाॅ.गजानन गुंजकर
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त आनंदी जीवन जगावे असे मत करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन गुंजकर यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सन्मान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय करमाळा यांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये पत्रकारांची रक्त तपासणी, ब्लडप्रेशर, इसीजी , शुगर हिमोग्लोबिन संपूर्ण आरोग्याची तपासणी करण्यात आली. या सन्मान व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ज्येष्ठ पत्रकार नासीरभाई कबीर, दिनेश मडके, जयंत दळवी, दस्तगीर मुजावर, नानासाहेब पठाडे, प्रफ्फुल दामोदरे, सूर्यकांत होनप, तुषार जाधव या पत्रकार बांधवांचा गुलाब पुष्प देऊन डॉक्टर गुंजकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्वसामान्य जनता पत्रकारांच्या कुटुंबाच्या सेवेसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय सदैव कार्यतत्पर राहणार असून आरोग्याच्याबाबत कुठलीही समस्या असेल तर त्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहुन काम करणार असल्याचे गुंजकर यांनी सांगितले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. घंटे,श्रीमती कडू पाटील, श्रीमती ढाकणे सिस्टर,श्रो. कोळेकर, श्री. माळी यांनी परिश्रम घेतले.