राजुरी येथील शेतकरी दांपत्य श्री पांडुरंग नामदेव खैरे सौ.नम्रता पांडुरंग खैरे यांच्या नवीन ऑइल मिलचे उद्या उद्घघाटन
राजुरी प्रतिनिधी
प्रधानमंत्री योजनेअंर्तगत राजुरी येथील शेतकरी दांपत्य श्री पांडुरंग नामदेव खैरे व सौ.नम्रता पांडुरंग खैरे यांनी खरेदी केलेल्या नवीन ऑइल मिलचे उद्घाटन बँक ऑफ इंडिया कोर्टी चे सहाय्यक व्यवस्थापक राजू सर आणि कृषी अधिकारी शैलेश शेलार यांच्या शुभहस्ते व डी. एस चौधरी साहेब मंडल कृषी अधिकारी, कृषी विभाग करमाळा, के.पी मस्तुद साहेब, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग करमाळा व श्री मनोज बोबडे, जिल्हा समन्वयक तथा जिल्हा संसाधन व्यक्ती, कृषी विभाग करमाळा यांच्या उपस्थितीत होणार आहे.
लोकांच्या आहारात खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. परंतु दुकानातून वेगवेगळ्या ब्रँडच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलामुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर आजार होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकांचे आरोग्य सदृढ व निरोगी व्हावे या हेतूने या ऑइल मिलचा उपयोग होणार आहे. सदर ऑइल मिल ची क्षमता ताशी 70 किलो तेल बिया गाळण्याची असून त्याला अन्न व औषध प्रशासनाची कायदेशीर मान्यता आहे.
या उद्घाटन प्रसंगी गावातील सर्व मान्यवर मंडळी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.