Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

रोजच्या रोज किराणा माल बाजारभावाची यादी वाचायला मिळत असल्याने ग्राहकांना होतोय फायदा

*
करमाळा :– रितेश किराणा अँड जनरल स्टोअर दत्त पेठ करमाळा या दुकानाचे मालक व व्यापारी संघटनेचे सर्वेसर्वा मा रितेश शेठ कटारिया यांच्या वतीने दररोज मालाच्या भावाची यादी प्रशिद्ध केली जाते व ग्राहक यादी पाहून बाजार भरतात, त्यामुळे हे काय भाव ते काय भाव अशे विचारायचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी सेवा देणारे तालुक्यातील एकमेव किराणा दुकान असून तालुकाभर या यादीची व दुकानाची चर्चा एकावयास मिळत आहे. रितेश कटारिया यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि आज तेलाचे भाव, धाण्याचे भाव रोजच्या रोज बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी मी दररोज ही यादी सकाळी लवकरात लवकर सर्व ग्रुपवर्ती सोडत असतो. त्यामुळे बरेचसे ग्राहक ही यादी पाहून माल खरेदी करतात. ग्राहकांची पसंती, ग्राहक खुश तर आम्ही व्यापारी खुश अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या ग्राहक सेवेमुळे लोकांचा खरेदीचा कल वाढला असून ग्राहकांचा संतोष हाच आमचा प्रसाद या प्रमाणे आम्ही सेवा देत आहोत व भविष्यात देखील देणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group