करमाळा

संघर्षमय जीवनातून पोथरे गावचे मा.सरपंच म्हणून यशस्वी वाटचाल करणारे विष्णू रंधवे यांचे कार्य प्रेरणादायी,-गणेश भाऊ चिवटे

करमाळा प्रतिनिधी सर्वसामान्य मध्यमवर्गीय ‌ कुटुंबात जन्म घेऊनही संघर्षमय जीवनातून वाटचाल करून गावची सरपंच ‌ अशी वाटचाल करणारे भाजपचे जेष्ठ नेते विष्णू रंधवे यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीचे ‌ ज्येष्ठ नेते ‌ कोचरे गावचे माजी सरपंच विष्णू रंधवे यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त ‌ आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त करून विष्णू रंधवे यांना शुभेच्छा दिल्या.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका विषयी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन विष्णू रंधवे यांना नक्कीच आपण त्यांच्या कार्याची पोचपावती देऊन सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे का सरचिटणीस काकासाहेब सरडे जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव,माजी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,वाशिंबेचे माजी उपसरपंच अमोल पवार भाजप सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष नितीन झिंजाडे, विनोद महानवर ,संजय किरवे महादेव गोसावी,शरद कोकीळ, शिवसेनेचे मा. बंडु शिंदे,लवकर , नाभिक संघटनेचे अध्यक्ष नारायण पवार राजाभाऊ जगताप पत्रकार दिनेश मडके जयंत दळवी, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते भाजपाचे नरेंद्रसिंह ठाकुर ,पत्रकार हरिभाऊ हिरडे नानासाहेब पठाडे रघुवीर झिंजाडे ज्ञानदेव नायकोडे आबासाहेब भांड आधी मान्यवराचे उपस्थितीमध्ये विष्णू रंदवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला या वाढदिवसास पोथरे पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व पंचक्रोशीतील नागरिकांना मिस्टाष्न भोजन देण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group