चांगल्या प्रतीचा ऊस गाळप केल्यास जास्त भाव देता येतो; बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे प्रतिपादन
करमाळा प्रतिनिधी
बारामती ॲग्रो यु. १ या साखर कारखान्याने करमाळा तालुक्यातील चिखलठाण गटातून १ लाख ५ हजार मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. त्यामुळे चिखलठाण व इतर परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांचा सत्कार शनिवार दि. ६ एप्रिल रोजी चिखलठाण येथे करण्यात आला. या परिसरातील सर्व ऊस वेळेत गाळप करून उच्चांकी दर दिल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते.
यावेळी चंद्रकांत काका सरडे, धूळा भाऊ कोकरे, महादेव कामठे, दादासाहेब लबडे, दादासाहेब डोंगरे, सागर पोरे, ज्ञानेश्वर पवार, शामराव गव्हाणे, राजिव कवितके, गोरख लबडे, आप्पा मंजुळे, अप्पासाहेब सरडे, सचिन सरडे, दादासाहेब सरडे, मधुकर गुंडगिरे, इनुस सय्यद यांच्यासह केन मॅनेजर बनगर साहेब, उप शेती अधिकारी चाकणे साहेब, कवडे साहेब, भोसले साहेब, हरिभाऊ गुळवे साहेब, टेळे साहेब, निंबोरे साहेब तसेच ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, शेतकरी व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.
चौकट…
बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांच्या सहकार्यामुळेच चिखलठाण व परिसरातील सर्वात जास्त ऊस बारामती ॲग्रो कारखान्याने वेळेत गाळप करून सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे.
मा. चंद्रकांत सरडे मा.उपाध्यक्ष आदिनाथ सह.साखर कारखाना
